Pimpri news: खळबळजनक ! राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

Pimpri news: खळबळजनक ! राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
Pckhabar-पिंपरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज (बुधवार) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास कार्यालय घुसून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने आमदार बनसोडे या हल्यात सुखरूप आहेत.

एका संशयित आरोपीला बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात दोघे जण घुसले. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलामधून 3 राऊंड फायर केले. मात्र, सुदैवाने बनसोडे सुखरूप आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *