Poem By Prasad Handore : कोविड योध्दे…!
Pckhabar-
आज होते नशीब जोरावर
देव उभा होता दारावर……
विचारले त्याने कसे आहे?
माझे पुढे प्रश्न पडला
कोण असती कोणास पुसती….
सांगताच त्याला, तोही हसला बघताच हे , चेहरा माझाही फुलला…….
आनंद झाला त्याला,
आई वडिलांवरचे प्रेम बघून, म्हणतो कसा, बघ पण जरा दुरून……
दिसले डॉक्टर, नर्स अन वॉर्डबॉय ,
धाय मोकलून रडत होती एक माय……..
दाखवले त्याने …..सफाई कर्मचारी
कशाचीही तमा नसे त्यांच्या ऊरी…..
दाखवला त्याने खाकीतला पांडुरंग ,
करीत होता स्वतःचे स्वप्न भंग….
दाखवले मज नाना रूप मनातल्या मनात रडलो खूप…खरंच आई वडिलांसम, प्रेम दावती रणांगणतले योद्धे, नवयुगातील शिवरायांचे
नव्या उमेदीचे कोवीड योद्धे….
कवी – प्रसाद प्रभाकर हांडोरे
सिन्नर, जिल्हा नाशिक










Leave a Reply