Pimpri crime news: संतापजनक! जम्बो कोविड सेंटरमध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे दागिने चोरीला
Pckhabar- नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेच्या अंगावरील 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
याप्रकरणी मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा
रणवीर जवाहर ठाकूर (रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्याने नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील
40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, यापुर्वी दोन रुग्णांचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते. जम्बो कोविड सेंटरमध्ये दागिने चोरीचा हा तिसरा प्रकार उघडकीस आल्याने रूग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.










Leave a Reply