Bhoom News : कै.पंडित पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालयाला १० ऑक्सिमीटर, २ थर्मल गण, ६ सेफ्टी किट भेेट
Pckhabar- ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथील ग्रामीण रुग्णालयाला कै. पंडित भालचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ १० ऑक्सिमीटर, २ थर्मल गण, ६ सेफ्टी किट आज (रविवार)भेट देण्यात आले.
हे सर्व साहित्य डॉ. जोगदंड, डॉ. भगवान गोपळघरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी नगरसेवक धनाजी शेंडगे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस भूम-परंडा-वाशी विधानसभा कार्याध्यक्ष प्रतिकसिंह पाटील, दीपक माळी, वसीम काजलेकर आदी उपस्थित होते.
याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस भूम-परंडा-वाशी विधानसभा कार्याध्यक्ष प्रतिकसिंह पाटील म्हणाले की ” ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. कोरोना रुग्णांसाठी १० ऑक्सिमीटर, २ थर्मल गण, ६ सेफ्टी किट भेट देण्यात आले आहे”.










Leave a Reply