Talwade Crime news: कुत्रे का भुंकत आहेत हे पाहायला बाहेर आला अन् मोबाईल गमावून बसला
Pckhabar-पहाटे कुत्रे का भुंकत आहेत, हे पाहायला तरूण घराबाहेर आला असता त्याच्याकडे एकाने अर्जंट फोन करायचा असल्याचे सांगून मोबाईल घेऊन पसार झाला. ही घटना ज्योतिबानगर, तळवडे येथे गुरूवारी घडली.
आदित्य दत्तात्रय भालेकर (वय-19, रा. ज्योतिबानगर, तळवडे) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरूवारी पहाटे पाच वाजता कुत्रे भुंकत होती. त्यामुळे आदित्य कुत्रे का भुंकत आहेत, हे पाहण्यासाठी घराबाहेर आला. यावेळी तेथे आलेल्या एका अनोळखी तरूणाने माझ्या घरी अर्जंट फोन करायचा आहे, असे म्हणून आदित्यकडून मोबाईल घेतला. आदित्यची नजर चुकवून आरोपी सहा हजार रूपयांचा मोबाईल घेऊन पसार झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply