Pimpri news: उद्या फक्त दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे लसीकरण!

Pimpri news: उद्या फक्त दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे लसीकरण!

Pckhabar-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आज गुरुवार कोविशिल्ड लसीचे ५००० डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे उद्या (शुक्रवार) फक्त ४५ वर्षापुढील नागरीकांनी पहिला डोस घेतलेला आहे. त्याच नागरीकांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे.

1 मे पासून वर्ष १८ ते ४४ या वयोगटामधील नागरीकांचे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिमेला वेग येत नाही.

या केंद्रावर मिळणार लस…

भोसरी- सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, छत्रपती शाहू महाराज शाळा दिघी, संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणीनगर, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय  च-होली,  प्राथमिक शाळा मोशी

सांगवी- कासारवाडी दवाखाना, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा पिंपळे गुरव, शितोळे शाळा सांगवी, बालाजी लॉन्स सांगवी, गणेश इंग्लिश मिडियम स्कुल दापोडी,

तालेरा- तालेरा रुग्णालय, बिजलीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, गुरुव्दार वाल्हेकरवाडी, मनपा शाळा वाल्हेकरवाडी, मनपा शाळा पुनावळे, सेक्टर २९ रावेत, आकुर्डी- हेगडेवार भवन, संजय काळे, आरटीसीसी, जाधववाडी, चिखली, थेरगांव- मनपा शाळा वाकड, मंगलनगर शाळा, भुमकरवस्ती शाळा, यशवंतराव चव्हाण स्कुल ग प्रभाग, कस्पटेवस्ती शाळा, वाय.सी.एम.एच- वाय.सी.एम.रुगणालय, नेहरुनगर दवाखाना, जिजामाता-  अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, काळेवाडी पवनानगर शाळा, यमुनानगर-  यमुनानगर रुग्णालय, स्केटींग ग्राऊंड सेक्टर २१, प्राथमिक शाळा म्ह्त्रेवस्ती, या लसीकरण केंद्रावर प्राधान्याने उपस्थित रहावे.

प्रत्येक लसीरकण केंद्राच्या ठिकाणी मर्यादित नागरीक/लाभार्थी यांना लसीकरण करण्यात येणार आहे. नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *