Big News: मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Big News: मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Pckhabar- गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) निर्णय दिला आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यामुळे मराठा समाजासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्‍वरराव, न्या. एस. अब्दुल नाझीर, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या.एस. रवींद्र भट यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला.

महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्यान्वये (एसईबीसी) मराठा समाजाला विविध शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सोळा टक्के आरक्षण देण्यात आले होते. याबाबत जून- २०१९ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या कायद्याच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले होते पण शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठीचा कोटा बारा टक्के तर सरकारी नोकऱ्यांमधील कोटा १३ टक्क्यांपर्यंत घटविला होता.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी मोर्चे काढले होते. समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 50 पेक्षा जास्त तरूणांनी बलिदान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *