Pune News : पुणे ते कन्याकुमारी सायकल फेरीमध्ये ७५ सायकलपट्टूचा सहभाग 

Pune News : पुणे ते कन्याकुमारी सायकल फेरीमध्ये ७५ सायकलपट्टुंचा सहभाग


Pckhabar- निरोगी  स्वास्थ्य जनजागृतीसाठी आणि आझादी का अमृत महोत्सवानिमित्ताने इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे ते कन्याकुमारी सायकल फेरीमध्ये ७५ सायकल पट्टू सहभागी झाले होते.

निगडी भक्ती शक्ती येथे किर्तीचक्र विजेते सुभेदार संतोष राळे, उद्योजक अण्णा बिराजदार, भारतीय आयुर्विमाचे  तात्यासाहेब शेवाळे, इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक गजानन खैरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या फेरिस आरंभ केला.

पुणे ते कन्याकुमारी १६०० किमीचा लांबचा पल्ला कापण्यासाठी आयएएस चे ७५ सदस्य उत्स्फूर्त सहभागी झालेले आहे.

10 दिवसांच्या प्रवास मोहिमेत पुणे – कराड – बेळगाव – येल्लापूर – मुरुडेश्वर – मंगळूर – थलासेरी – गुरुवायूर – अलप्पुझा – तिरुवनंतपुरम – कन्याकुमारी अशी ठिकाणे समाविष्ट आहेत. सर्व रायडर्स दररोज 170-180 किमी अंतर सायकल प्रवास करतील.

इंडो ॲथलेटिक्स सोसायटी द्वारे वर्षभर वृक्षारोपण, गड-डोंगर-नदी स्वच्छता यांसारख्या विविध मोहिमा राबवल्या जातात. देशभरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांशी सहयोग करून  पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा सुधारण्या साठी पुढाकार घेतात . आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांना  लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे  प्रशिक्षण देण्याची आम्हाला संधी मिळाल्याने  इंडो ॲथलेटिक्स सोसायटी ला अभिमान आहे. अशी माहिती गजानन खैरे यांनी यावेळी दिली.

 या महामारीच्या काळात सर्व व्यक्तींसाठी आरोग्य हा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे. आणि आम्ही गेली  10 वर्षांपासून आरोग्यावर काम करत आहोत. तामिळमधील हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पडलेले  सीडीएस बिपीन रावत व त्यांचे सहकारी यांना  ही राइड समर्पित केली असल्याची माहिती गणेश भुजबळ यांनी दिली.

ही इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे मुख्य सल्लागार उद्योगपती अण्णारे बिरादार, उद्योगपती सुभाष जयसिंघानी, सीए के.एल. बंसल, डॉ सुहास माटे,अजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सायकल फेरीचे आयोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *