Pune District News : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान


Pune District News : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

शुक्रवारी विधानभवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीनंतर डॉ. पवार यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले” कोरोना महामारीत वैद्यकीय विभागासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगले कार्य केले आहे. त्यामुळेच आपण आज कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे. ” यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *