IAF Chopper Crash : देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचे निधन

IAF Chopper Crash : देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचे निधन


Pckhabar- देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचे तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले आहे.

आज बुधवार दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

घटनास्थळावरून एकूण ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. उरलेल्या ३ जणांची प्रकृती गंभीर सांगितली जात होती. जखमी झालेल्या व्यक्ती ८० टक्क्यांहून जास्त प्रमाणात भाजल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यामध्ये जनरल बिपीन रावत यांच्यावर देखील उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या अपघातात त्यांच्या पत्नीचे ही निधन झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *