Hinjewadi Crime News : घर मालकीनीसह दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन कामगार दाम्पत्याने तिजोरीवर मारला डल्ला

Pckhabar- घर काम करणार्या एका दाम्पत्याने घर मालकीनीला आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुध्द केले. घरातील लॉकर तोडून दीड लाखांची रोकड, सोन्याचे दागिने चोरून दाम्पत्य पसार झाले. ही घटना बावधन येथील गोल्डन आर्च सोसायटीत मंगळवारी रात्री घडली.
किशोर व त्याची पत्नी पुजा (रा. नेपाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हितेश सुभाषचंद्र धिंग्रा (वय-46, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण श्रुती रवि खोसला या बावधन येथील रो हाऊसमध्ये राहण्यास आहेत. मंगळवारी श्रुती या मुलांसह घरी होत्या. याचाच फायदा घेऊन त्यांच्याकडे घर काम करण्यासाठी असलेले किशोर व त्याची पत्नी यांनी श्रुती व त्यांच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुध्द केले. त्यानंतर आरोपी दाम्पत्याने घरातील लोखंडी लॉकर तोडून दीड लाखांची रोकड, सोन्याचे दागिने चोरून करून पसार झाले. फौजदार बोरकर अधिक तपास करत आहेत.











Leave a Reply