Bhosari Crime News : विक्रीसाठी आणलेली व्हेल माश्याची 1 कोटीची उलटी जप्त, दोघांना अटक

Pckhabar- विक्रीसाठी आणलेली व्हेल माश्याची 1 कोटी 10 लाख रूपयांची उलटी आणणार्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने मोशी येथे सोमवारी केली.
जॉन सुनिल साठे (वय-33, रा. मगरमळा, नाशिक रोड), अजित हुकुमचंद बागमार (वय-61, रा, कारंजा, नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मोनेज अली (रा. भिवंडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस शिपाई प्रमोद रोहिदास गर्जे (वय-33) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जॉनकडे बेकायदेशीर असणारी व्हेल माश्याची उलटी असल्याचे गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाला समजले. आरोपी जॉन हा मोशी येथे व्हेल माश्याची उलटी विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोशी येथील इंद्रायणी मोटेल हॉटेलसमोरील गेटजवळ सापळा लावला. त्यावेळी जॉनकडे कसून तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे 1 कोटी 10 लाख रूपये किंमतीची 550 ग्रॅम वजनाची व्हेल माश्याची उलटी सापडली. पोलिसांनी ही उलटी जप्त केली. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर आरोपी बागमार आणि मोनेज अली यांनी ही उलटी जॉनकडे विक्रीसाठी कुरियरने पाठवल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी जॉन व बागमार याला अटक केली असून आरोपी मोनेज अली याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील अधिक तपास करत आहेत.











Leave a Reply