Pimpri Crime News : पोलीस भरती परीक्षेत डमीसह मुळ उमेदवाराला बेड्या

Pckhabar- पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत डमी बसणाऱ्या उमेदवारासह दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बावधन येथील अरिहंत इन्सिटुट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, बुद्रुक या परीक्षा केंद्रावर उघडकीस आला.
मुनाफ हुसैन बेग ( रा. सिदधी काळेगांव, ता जि जालना), प्रकाश रामसिंग धनावत (रा. करमाड ता जि औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुपरविझन करणाऱ्या एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपायाच्या 720 जागांच्या भरतीसाठी शहरातील 80 सेंटरवर लेखी परीक्षा शुक्रवारी झाली. बावधन येथील अरिहंत इन्सिटुट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या परीक्षा केंद्रावर आरोपी मुनाफ हुसैन बेग हा पोलीस भरतीसाठी आला होता. मात्र, त्याने परीक्षा न देता त्यांच्या जागी प्रकाश रामसिंग धनावत याला परीक्षेला डमी म्हणून बसविले. त्याने मुळ उमेदवार प्रकाश धनावत याच्या नावाची खोटी सही करुन शासनाची फसवणूक केली.
दरम्यान, हिंजवडी येथील एका परीक्षा केंद्रावर एका उमेदवाराने कॉपी करण्यासाठी मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. पोेलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच पेपर सुरू होण्यापुर्वीच उमेदवार पळून गेला होता. त्याच्यावरही हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply