Big News : तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा !

Pckhabar- कृषी कायदे मागे घेण्यासाठी मागील एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून या लढ्याला यश आले आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी घोषणा केली आहे.
आज गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केली. येत्या संसदेच्या अधिवेशनात हे तीन कायदे मागे घेण्याची संविधान प्रक्रिया सुरू होणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचं मोदी म्हणालेत. तसंच माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची दिली आहे.
गेल्या 4 वर्षांत 1 लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसंच केंद्र सरकारचं कृषी बजेट पहिल्यापेक्षा 5 पटीनं वाढल्याचं ते म्हणालेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट जमा केले. अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
100 पैकी 80 शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे. शेतकऱ्यांसाठी कृषीकर्ज दुप्पट केलं. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.










Leave a Reply