Pune District News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम जाहीर

Pune District News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम जाहीर

पुणे जिल्ह्यात कार्यक्रम राबविण्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचे आदेश

देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मोहिमेला सुरूवात: डॉ. किशोर यादव यांची माहिती

Pckhabar-स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत निदान व जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदलाबाबत पुणे जिल्यातील तालुका आरोग्य अधिकारी हद्दीत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष मोहिम राबविण्याचा आदेश पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिले आहेत. तसेच ही मोहिम अत्यंत महत्वकांक्षी असल्यामुळे या मोहिमेला विशेष प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही डॉ. पवार यांनी केली आहे.

दरम्यान, या आदेशानुसार देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत निदान व जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदलाबाबत विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली आहे.

स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त दि. 16 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2021 या कालावधीत असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत निदान व जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदलाबाबत विशेष मोहिम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार 30 वर्षावरील लोकांचे पाच आजाराकरीता उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे त्या अंतर्गत प्रती दिवस 100 व्यक्तींची प्रत्येक आरोग्यवर्धिनी/उपकेंद्रामध्ये तपासणी करावी. (Populatiob Based Screening)

सर्व तपासणी केलेल्या व्यक्तींची माहिती NCD IT PORTAL दररोज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अद्यावत करण्यात यावी. त्याबरोबर Digital Health ID बनविण्यात यावा प्रत्येक आरोग्यवर्धिनी / उपकेंद्रामध्ये प्रति आठवडा किमान 10 Wellness session (उदा. YOGA, Marathon / Walkathon,, Cycling Race, विविध खेळांचे आयोजन विविध स्तरांवर ( School, बचत गट, महिला मंडळ, कार्यालय, ग्रामसभा, इ.स्तरावर करण्यात यावे.) ही मोहिम यशस्वी करण्यासाठी CHO/ANM/MPW/ASHA यांना कामाचे वाटप करण्यात यावे. तसेच तालुकानिहाय व प्रा. आ. केंद्र निहाय दैनंदिन कामावर सनियंत्रण करण्यासाठी एका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.

या मोहिमेचे जिल्हास्तरावरुन मुल्यांकन करण्यात येणार आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संबंधित CHO/ANM/MPW/ASHA यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा सन्मानित करण्यात येणार आहे.

या मोहिमेबाबत माहिती देताना डॉ. किशोर यादव म्हणाले ” पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या आदेशानुसार देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील 30 वर्षावरील लोकांचे पाच आजाराकरीता उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे निदान होण्यासाठी मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत प्रती दिवस 100 व्यक्तींची प्रत्येक आरोग्यवर्धिनी/उपकेंद्रामध्ये तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेबाबत सोशल मीडियावर जनजागृती केली जाणार आहे. जेणेकरून या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *