Maharashtra News : राज्यातील कारखाने आस्थापनांना कामगार सुरक्षा बाबत सक्तीचे आदेश

Maharashtra News : राज्यातील कारखाने आस्थापनांना कामगार सुरक्षा बाबत सक्तीचे आदेश


कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या मागणीची दखल
Pckhabar- महाराष्ट्रातील कारखाने, अस्थापना व इतर छोट्या  कार्यक्षेत्रात     कामगारांच्या सुरक्षे बाबत दुर्लक्ष  होत असून यामुळे अनेक कामगारांचे हात,पाय, निकामी होत असून  चुकीच्या निर्णयामुळे अनेक कामगारांचे मृत्यू होत  आहेत.  त्यामुळे राज्यातील कष्टकरी कामगारांच्या सुरक्षेबाबत  दखल घ्यावी व  तशी सक्ती करावी  अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजित पवार आणि कामगार मंत्री  हसन मुश्रीफ़ यांच्याकडे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली होती. त्याची दखल घेऊन  महाराष्ट्र शासनाचे  अवर सचिव रा.शा. कौरते  यांनी  संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय  कामगार भवन मुंबई  यांना आदेश देऊन निवेदनात नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने कारखाने अधिनियम १९४८  च्या तरतुदीनुसार आवश्यक कारवाई करावे असे आदेश देण्यात आले आहेत.

यामुळे अनेक निष्पाप कामगारांचे मृत्यू व  अवयव निकामी होणे  टळणार आहेत. म्हणून कामगारांनी  समाधान व्यक्त केले आहे. कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष  काशिनाथ नखाते यांनी  दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील कारखाने, अस्थापना  औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी म्हणून  दर वर्षी  ४मार्च ते ११ मार्च या कालावधीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो.  आणि २ नोव्हेंबर हा सुरक्षा दिन साजरा केला जातो.  नुकताच हा  महाराष्ट्रातील काही अस्थापना व कारखान्यासामोर सुरक्षा फलक दिसले तर कुठे दिसले नाहीत.  याबाबत कष्ट करना-या  कामगारांमध्ये जनजागृती केली जात नसून त्यांची अवयवहानी व जीवितहानी टाळण्यासाठी कामगारांना सुरक्षा बाबत  प्रशिक्षण देण्यात यावे व याचे तंतोतंत पालन न करना-या कारखान्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.   देशात उद्योग क्षेत्रातील कामगार यांचे हितासाठी , सुरक्षेसाठी  राष्ट्रीय सुरक्षा परिषदने महत्वाच्या तरतूदी केल्या.  आंतरराष्ट्रीय कंपन्या सोडल्या तर छोटे कारखाने  तसेच  प्रवेशद्वारावर फलक लावणे पलीकडे काहीच काम होत नाही, सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व काय हे सर्व प्रकारचे कामगार संघटित,असंघटित असुरक्षित  कंत्राटी कामगारांनाही या कामगारांना प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यांना सुरक्षा साधने पुरवली जात नाही याबाबत प्रशिक्षणही दिले जात नाही. त्यामुळे पर्यायाने अनेक वेळा  अपघाताला सामोरे जावे लागते यात पूर्ण हात तूटने  अनेक वेळा पाय जाणे , हाताची बोटे जाणे त्याचबरोबर अपंगत्व येणे आणि मशीनखाली  कामगाराचा मृत्यू होणे अशा प्रकारच्या घटना  दररोज  पुण्यासह महाराष्ट्रातील विविध औद्योगिक क्षेत्रातील  कारखान्यांमध्ये घडत आहेत हि  गंभीर बाब असून त्याला कंपन्या व उद्योजक जबाबदारीने घेत नाहीत म्हणून राज्य शासनाने याबाबत कडक पावले उचलणे गरजेचे आहे. सुरक्षा सप्ताह  म्हणजे काय ? हेच अजुनही  माहीत नाही.  अनेक उद्योग  मालकांनी सुरक्षा सप्ताहाचा केवळ फार्स उभा  केला  आहे, सन १९४८  मध्ये कारखाने अधिनियम हा कायदा लागू करण्यात आला. बेजबाबदारपणे होणारे मानवांची हानी या बाबत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने ४मार्च १९६६ पासून सुरक्षा दिन साजरा केला सुरू केला तेव्हापासून ४ मार्च ते ११ मार्च या काळात सुरक्षा सप्ताह आणि २ नोव्हेंबर  रोजी सुरक्षा दिन साजरा  साजरा केला जातो. मात्र, अनेक अस्थापना याबाबत माहितीही नाही काही तारतम्य नाही. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून तसेच आस्थापना कडून त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा घेणे निबंध लेखन , कविता स्पर्धा  अशा प्रकारच्या उपक्रमातून कामगारांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे मात्र असं अलीकडच्या कालावधीमध्ये होताना दिसत नाही कामगारांना आपली जोखीम व्यवस्थापनाकडून  शिकवण्याची गरज आहे.

कुटुंबप्रमुखाचा अपघातात गेल्यावर कुटुंबाची खूप मोठी हानी होत असते आणि  त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर येते . मोठमोठ्या कारखान्या बरोबरच खान, रेल्वे ,गोदामे, बंदरे ,रस्ते पूल निर्मिती ,धरणे  विभाग छोटी खाजगी आस्थापने  यामध्येही याबाबत जनजागृती व सुरक्षेकामी आदेश पारित करावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार रा. शा. कौरते यानी आदेश काढले आहेत.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या निवेदनावर उपाध्यक्ष राजेश माने, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार उपाध्यक्ष भास्कर राठोड, विनोद गवई ,बालाजी इंगळे, उमेश डोर्ले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *