Dehu News : इंद्रेश्वर मंदिर परिसरामध्ये देशी रोपांची लागवड

Dehu News : इंद्रेश्वर मंदिर परिसरामध्ये देशी रोपांची लागवड

Pckhabar- गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र इंदुरी येथील श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टच्या वतीने इंद्रेश्वर मंदिर परिसरामध्ये देशी रोपांची लागवड करण्यात आली.

गुरुपौर्णिमेच्या निमित्त श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्ट मंदिरामध्ये भजन आदी धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
श्री दत्तात्रेय कानिफनाथ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक महाराज गरुड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

मंदिर परिसरातील वातावरण प्रसन्न रहावे. शुद्ध ऑक्सिजन मिळावा, आलेल्या भक्तांना उन्हाळ्यामध्ये सावलीला बसता यावे, या उद्देशाने देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *