Dehuroad News : साडेचार हजार नागरिकांना वाटला रोगप्रतिकारशक्ती काढा
Pckhabar-कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत देहूरोड येथील वैद्य डॅनियल चक्रनारायण यांनी पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्यासह साडेचार हजार नागरिकांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोफत आयुर्वेदीक काढा वाटला आहे.
डॅनियल चक्रनारायण यांचे वडिल वैद्य होते. त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गेल्या 25 वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रात ते कार्यरत असून अनेक नागरिकांवर त्यांनी मोफत उपचार केले आहेत. मणक्यातील गॅप, गुडघेदुखी दुर करण्यासाठी चक्रनारायण यांचा विशेष हातखंडा आहे. तर मुळव्याध, मुतखडा दूर करण्यासाठी ते झाड पाल्याचे आयुर्वेदीक औषध बनवून देतात.
कोरोनाच्या जागतिक महामारीने मोठे संकट निर्माण केले आहे. या महामारीच्या काळात प्रत्येक जण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुर्वेदीक औषधांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. कोरोनाच्या या संकटात अनेक नागरिक आयुर्वेदीकाकडे वळले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत चक्रनारायण यांनी पपईची पाने, बेलाची पाने, कोरफड, गुळवेल, आद्रक, लसूण, लवंग, दालचिनी, काळीमिरी, तेजपता याचा काढा बनवून त्यांनी पिंपरी-चिंचवडसह, देहूरोड आणि मावळातील साडेचार हजार नागरिकांना काढ्याचे वाटप केले आहे.















Leave a Reply