Entertainment News : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना अटक

Entertainment News : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना अटक
Pckhabar-अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्राला (Raj kundra) पॉर्न फिल्म्स (porn films) तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) गुन्हे शाखेने अटक केली आहे.

जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर क्राईम ब्रँचने सोमवारी रात्री 11 वाजता त्याला मुंबईत बेड्या ठोकल्या.

राज कुंद्रा हा या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप आहे. या पॉर्न फिल्म्स प्रकरणात राज कुंद्रासह नेरूळमधून आणखी एकाला अटक केली आहे.

दरम्यान या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आलीय. राज कुंद्राने या सर्व रॅकेटचा व्यवहार करण्यासाठी एक H accounts या नावाने 5 जणांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *