Dahu News : प्रगतशील शेतकरी गोविंदराव हगवणे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त 61 देशी रोपांची लागवड
Pckhabar- देहू नगरीचे प्रगतशील शेतकरी गोविंदराव बाळासाहेब हगवणे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त देहू बाह्य वळण रस्ता येथे 61 देशी रोपांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, पंढरपूर देवस्थान संस्थान विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, माजी उपसरपंच संतोष हगवणे, देहू भाजप शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, सचिन मराठे आदी उपस्थित होते.
प्रविण हगवणे मित्र परिवाराच्या वतीने आप्पाना शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकिय पक्षातील पदाधिकारी, अभंग प्रतिष्ठान, शिव मल्हार गडाचे अध्यक्ष, विश्वस्त असे अनेक उपस्थित होते. आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अनुक्रमे देहू भाजप प्रभारी निष्णात वकील, कैलास अण्णा पानसरे, प्रा. विकास कंद, संतोष हगवणे, देहू भाजप शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, देहूरोड भाजप च्या वतीने तुकाराम नाना जाधव यांनी दिल्या.
खास भेट म्हणुन हिरामण, प्रविण, प्रशांत यांच्या वतीने आप्पांना विद्युत दुचाकी कैलास पानसरे, प्रकाश मोरे, विकास कंद यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व मित्र आप्तेष्ट परिवाराचे आभार प्रविण हगवणे यांनी केले. प्रसंगी उपस्थित प्रामुख्याने सचिन मराठे, सचिन काळोखे, गणेश खंडागळे अणि समस्त हगवणे परिवारातील सदस्य होते.










Leave a Reply