Dehu News : बडवे ग्रुप ऑफ कंपनीच्या सुप्रिया बडवे यांच्या वाढदिवसानिमित्त ५० गरजू कुटुंबांना रेशन किट, कपडे वाटप

 

Dehu News : बडवे ग्रुप ऑफ कंपनीच्या सुप्रिया बडवे यांच्या वाढदिवसानिमित्त ५० गरजू कुटुंबांना रेशन किट, कपडे वाटप
Pckhabar-बडवे ग्रुप ऑफ कंपनीच्या सर्वेसर्वा सुप्रिया बडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (शनिवार) कशाळ भोईरे, येथे कातकरी व ठाकर वस्तीत जाऊन ५० गरजूं कुटुंबांना रेशन किट व कपडे वाटप करण्यात आले.तसेच लहान मुलांना केक व खाऊ वाटप करण्यात आला.

सुप्रिया बडवे यांच्या हस्ते वस्तीत वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात वस्तीतील पुरूष व महिला यांना स्वयं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी इथे प्रशिक्षण देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी सुप्रिया बडवे यांना पुणेरी पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक साहेबराव कड, प्रतिभा भारती, रोटरी क्लब ऑफ पुणे डायमंड, अध्यक्ष जोग मॅडम आणि सरपंच भोईरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कर्तव्य फाउंडेशन, देहू सर्व सदस्य व वि. हि. पण. बजरंग दल, मावळचे सदस्य यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *