Dehu News : कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते अमित शिवळे यांचे निधन
Pckhabar- सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गोर-गरीब नागरिकांसाठी सतत कार्यरत असलेल्या कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य आणि खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक अमित शिवळे यांचे आज सकाळी निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने देहूगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अमित शिवळे यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
कर्तव्य फाऊंडेशनच्या मार्फत अमित शिवळे हे देहूगावसह आदी परिसरातील गोर-गरीब नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मदत करत होते. अनेक गरजू कुटूंबांना त्यांनी दरमहा राशन योजना सुरू केली होती. लाॅकडाऊनमध्ये गरजू नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य वाटपासह विविध उपक्रम राबविले होते.
तसेच अमित शिवळे हे एक हरहुन्नरी कलाकार होते. त्यांच्या खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रमामधून महिलांचे मनोरंजन केले. हा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील घराघरात पोहचला होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने देहूगाव परिसरात शोककळा पसरली आहे.









Leave a Reply