Hinjawadi Crime News: दुकानासमोर दुचाकी लावण्यास मनाई केल्याने दुकानदाराला बेदम मारहाण

Hinjawadi Crime News: दुकानासमोर दुचाकी लावण्यास मनाई केल्याने दुकानदाराला बेदम मारहाण
Pckhabar- किराणा दुकानासमोर दुचाकी लावण्यास मनाई केल्याने चार जणांनी दुकानदाराला शिवीगाळ करत हॉकी स्टीकने, लाथाबुक्यांनी, लाकडी पट्यांनी जबर मारहाण केली. तसेच परत इथे दिसला तर तुला परत मारू, तुझे दुकान फोडून टाकू, अशी धमकी देऊन पळून गेले. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता मारूंजी येथे घडली.
याप्रकरणी सुनिल गोपाराम सिरवी (वय-23, रा. मारूंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन हरपुडे, बंटी (पुर्ण नाव, पत्त्ता माहित नाही), (एमएच-14, डी क्यू 2409) दुचाकीवरील तरूण यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे मारूंजी येथे किराणा दुकान आहे. या दुकानासमोर आरोपीपैकी एक जण दुचाकी पार्क करत होता. फिर्यादीनी दुचाकी लावण्यास मनाई केल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी हॉकी स्टीक त्यांच्या डोक्यात मारली. लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. त्यांच्यावर लोखंडी रॉडने वार केला. मात्र, त्यांनी तो वार चुकविला. तसेच आम्हाला तु येथे परत दिसलास तर तुला परत मारू, तुझे दुकान फोडून टाकू, अशी धमकी देऊन पळून गेले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *