Hinjawadi Crime News : जमिनीच्या व्यवहारातून डाॅक्टरची 81 लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा
Pckhabar- कासारसाई येथे जमिनीचे खरेदीखत करून देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची तब्बल 81 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते 8 जून 2012 या कालावधीत घडला.
अमित देवराम कलाटे (रा. वाकड चौक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. पंकज पोपटराव येवले (वय-48, रा. रहाटणी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना कासारसाई येथे 16.5 क्षेत्राचे खरेदीखत करून देतो, असे सांगितले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 81 लाख 50 हजार रुपये बॅक खात्यावर स्विकारले. मात्र, खरेदीखत करून न देता त्यांची फसवणूक केली.
हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.









Leave a Reply