Mulshi News : आग लागलेल्या रासायनिक कंपनीची कामगार राज्यमंत्री बच्चु कडू यांनी केली पाहणी
Pckhabar- मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीतील एस वी एस या कंपनीत आगीच्या दुर्घटनेत 18 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी आज (मंगळवार) प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच प्रत्यक्षदर्शींसोबत चर्चा केली.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे, कामगार नेते मच्छिंद्र परंडवाल, एक्साईज इन्स्पेक्टर तानाजी शिंदे, सुहास भोते, सागर गुंड पाटील, अजिंक्य हगवणे देखील उपस्थित होते.
ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानंतर कारवाई करण्यात येईल.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. या पीडित कामगार कुटुंबीयांची देखील यावेळी भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. तसेच योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.









Leave a Reply