HSC Exam News : अखेर बारावीची परीक्षा रद्द
Pckhabar- (Maharashtra HSC exam Cancelled) करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (Maharashtra Board) शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा (Maharashtra HSC exam cancelled) अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं. शिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती.
दरम्यान, कोविड परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याबाबत मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारला माहिती दिली होती. काल झालेल्या बैठकीत 12 वीच्या परीक्षेसंदर्भात चर्चा झाली. 12 वीची परीक्षा मे एंडपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता कोविडच्या प्रभावामुळं 12 वीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाली. आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यानंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत, असं गायकवाड म्हणाल्या होत्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर याआधीच राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यावर राज्य सरकारही बारावीची परीक्षा रद्द करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते.









Leave a Reply