Bhosari crime news: टेम्पोला दुचाकी अडवी लावून चालकाला मारहाण करत लुटले

Bhosari crime news: टेम्पोला दुचाकी अडवी लावून चालकाला मारहाण करत लुटले
Pckhabar- टेम्पोला अचानक दुचाकी अडवी लावून तिघांनी टेम्पो चालकाला मारहाण करून 10 हजापांची मोबाईल 8 हजारांची रोकड असा 18 हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. हा प्रकार शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास फुगेवाडी येथे घडला.
जितेंद्र यलगुन गायकवाड (वय-33, रा. नागपुर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अनोळखी तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टाटा अल्ट्रा टेम्पो (एमएच-31, एफ.सी 9660) घेऊन फुगेवाडी येथून जात होते. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अचानक टेम्पोला दुचाकी आडवी लावली. दोघांनी  फिर्यादी यांना पालघन मारून गंभीर जखमी केले. त्यांच्याकडील 10 हजारांचा मोबाईल, 8 हजारांची रोकड असा 18 हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *