Crime news: भोसरी, वाकडमधून दोन मुलींचे अपहरण

Crime news: भोसरी, वाकडमधून दोन मुलींचे अपहरण
Pckhabar- भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरीतील घटनेप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला आहे.
तसेच वाकड येथील घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विकास देविदास पारधे (वय-25, रा. मोरवाडी, मुळ आंबेजोगाई) या संशयित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला आरोपीने याने तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन तिला पळवून नेले आहे. या दोन्ही प्रकरणाचा भोसरी आणि वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *