Bhosari crime news: विवाहितेला 10 लाखांसाठी मारून टाकण्याची धमकी  

Bhosari crime news: विवाहितेला 10 लाखांसाठी मारून टाकण्याची धमकी
Pckhabar- वडिलांकडून घर घेण्यासाठी 10 लाख रूपये आणण्याची मागणी करत विवाहितेला शिळे अन्न खायला देऊन, उपाशी ठेवून मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी सासरच्या चौघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भोसरी येथे नुकताच उघडकीस आला.
अक्षय (वय-26), बेबी सुर्यकांत निकाळे (वय-45), सुर्यकांत खंडू निकाळे (वय-50), अनिकेत सुर्यकांत निकाळे (वय-24, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करणत आला आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना वडिलांकडून घर घेण्यासाठी 10 लाख रूपये आणण्याची मागणी करत घरातून निघून जा नाहीतर तुला आम्ही मारू टाकू, अशी धमकी दिली. तसेच त्यांना शिळे अन्न खायला देऊन, उपाशी ठेवून शारिरीक आणि मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने पोलील ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *