Chinchwad crime news: ज्येष्ठ महिलेची सोन्याची चैन हिसकावली

Chinchwad crime news: ज्येष्ठ महिलेची सोन्याची चैन हिसकावली
Pckhabar- मैत्रिण आणि मुलीसह पायी जाणार्‍या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 70 हजार रूपयांची सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या एकाने जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना गुरूवारी सकाळी आठ वाजता चिंचवड येथे घडली.
मंगला रविंद्र सरदेशमुख (वय-66, रा. इंदिरानगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 22 वर्षांच्या अनोळखी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी या त्यांची मुलगी स्मिता, मैत्रिण सुजाता नवरंगे यांच्याबरोबर इंदिरानगर येथून पायी जात होत्या. दुचाकीवरून मास्क लावून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 70 हजार रूपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *