Maharashtra News : कोरोनामुक्त झालेल्यांना तीन महिन्यानंतर मिळणार लस

Maharashtra News : कोरोनामुक्त झालेल्यांना तीन महिन्यानंतर मिळणार लस

Pckhabar- कोरोनामुक्त झालेल्यांना आता तीन महिन्यांनी लस देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फॉर कोविड -19 (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या समितीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

नव्या नियमावलीनुसार, पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्यास दुसऱ्या डोस कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

तसेच स्तनपान करण्याऱ्या सर्व महिलांना कोरोनाची लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनामुक्त व्यक्तीला अँटीबॉडी किंवा प्लाझ्मा दिला असल्यास  त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या तीन महिन्यानंतर कोरोनाची लस घेण्यास सांगितलं आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना चार ते पाच आठवडे प्रतीक्षा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  त्याचबरोबर गर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *