Pimpri news: भाजपला धक्का, भाजपा ओबीसी मोर्चाच्या माजी शहराध्यक्ष सारिका पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या माजी शहराध्यक्ष सारिका पवार यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रविंद्र पाटील, सरचिटणीस अशोक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सारिका पवार या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जात आहेत. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सारिका पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.










Leave a Reply