Maharasht news: भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘आत्मनिर्भर’ मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन
Pckhabar- ‘आत्मनिर्भर योजने’चा फायदा समाजातील उपेक्षित आणि गरजू घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.
भाजयुमोच्या आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचा फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक आदी याप्रसंगी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही महत्वकांक्षी योजना नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरात या योजनेची माहिती संबंधित घटकांपर्यंत पोहचविली जाणार आहे. सुरुवातीला प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यात एक केंद्र व दुसर्याज टप्प्यात प्रत्येक विधानसभा स्तरावरती एक केंद्र अशी या आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राची रचना असणार आहे. युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुशील मेंगडे, राहुल लोणीकर, शिवानी दाणी, हर्षल विभांडीक हे या केंद्राचे नियोजन करत आहेत.
यावेळी आत्मनिर्भर भारत योजनांची माहिती देणार्या पुस्तिकेचे तसेच आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे पोस्टरचे प्रकाशन फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.










Leave a Reply