Pimpri news: सहा महिन्यांचा मिळकतकर माफ करा; आमदार महेश लांडगे यांची मागणी

Pimpri news: सहा महिन्यांचा मिळकतकर माफ करा; आमदार महेश लांडगे यांची मागणी
Pckhabar-कोरोनामुळे पिंपरी चिंचवडमधील  व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोना काळातील मिळकतकर माफ करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

महापालिका सर्वसाधारण सभेत तसा ठराम मंजूर करुन महाविकास आघाडी सरकारच्या नगर विकास विभागाला पाठवण्यात आला. आता राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत हा प्रस्ताव आहे.
दरम्यान,  आमदार महेश लांडगे यांनी  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनाही मिळतककर माफीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

लांडगे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, कोरोना व लॉकडाऊनमध्ये उद्योजकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व निवासी व बिगरनिवासी (कमर्शियल), औद्योगिक मिळकतींवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मिळकत माफ करण्याचा ठराव पिंपरी चिंचवड महापालिकेने मंजूर केला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपसुचना मंजूर होऊन हा ठराव पारित करण्यात आला. मात्र, कर माफ करण्याचा निर्णय हा राज्य शासनाच्या अखत्यारीत येतो.
शासनाच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या महामारीत मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. लहानापासून मोठे उद्योग या काळात पूर्ण बंद होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी विविध उपाययोजना उपलब्ध केल्या होत्या. उद्योगधंदे बंद असल्याने त्याचा लघुउद्योजक, व्यापारी, छोटे मोठे व्यायसायिक, उद्योजकांना फटका बसला. या आर्थिक फटक्यातून बाहेर येण्य्साठी उद्योजकांना बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे या वर्गाला मिळकत कर भरणे जिकीरीचे होत आहे, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *