Alandi News: आळंदी नगराध्यक्षांच्या पतीचा कामकाजातील हस्तक्षेप थांबवा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Pckhabar- आळंदी नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर-कांबळे यांच्या पतीचा परिषदेच्या कामकाजात होणारा हस्तक्षेप त्वरित थांबवावा, असा आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिला आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास पाठविण्याचा आदेश ही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

आळंदी नगरपरिषदेच्या कामकाज नगराध्यक्षा यांचे पती नगरपरिषद कामकाजात असलेल्या हस्तक्षेपाबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर) यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. चौकशीत मा.नगराध्यक्षा यांचे पती नगरपरिषदेच्या कामकाजामध्ये सहभाग घेत असल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेच्या कामकाजात नगरसेविका यांचे पती/ नातेवाईक यांचे सभेचे कामकाज/चर्चा यामध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत तसेच नगरपरिषदेच्या कार्यालयीन कामकाजातील ढवळाढवळ, हस्तक्षेप करणे किंवा कर्मचारी/अधिकारी यांच्याशी घलणे, उपमर्द करणे इ. गैरवर्तणूक बाबी निदर्शनास आल्यास नगरपरिषदेचे अध्यक्ष/ मुख्याधिकारी यांनी याबाबत त्वरीत दखल घेऊन उचित कार्यवाही करणेबाबत शासन नगरविकास विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जीईएन-१०९३/१३४५/प्र.क्र१०६/९३/नवि-१४ दि. २० जुलै १९९३ मध्ये स्पष्ट नमूद केले आहे. सदर शासन निर्णयानुसार नगराध्यक्षा यांचे पतीचा नगरपरिषद कामकाजातील हस्तक्षेप थांबवणेबाबत त्वरीत कार्यवाही करावी व अहवाल या कार्यालयास पाठवावा, असा आदेश
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिला आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास पाठविण्याचा आदेश ही त्यांनी आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply