Dehu news : दिवाळीनिमित्त गरजू महिलांना साड्यांचे वाटप

 

Dehu news : दिवाळीनिमित्त गरजू महिलांना साड्यांचे वाटप
Pckhabar- दिवाळी सणाचे औचित्य साधून कर्तव्य फाउंडेशन देहू यांच्या वतीने 30 गरजू भगिनींना नवीन साड्याचे वाटप करण्यात आले.

देहूगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. देहूगाव परिसरातील गरजूंना सातत्याने कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने मदतीचा हात दिला जातो. दिवाळी सणामध्ये 100 गोर- गरीब नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले होते.

तसेच दिलीप आहेर आणि कल्पना आहेर यांच्या सौजन्याने दिवाळीनिमित्त 30 गरजू महिलांना नवीन साड्याचे वाटप करण्यात आले.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *