Pune News: पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात लढत

Pune News: पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात लढत
Pckhabar- विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात सरळ लढत होणार आहे. दोनही सांगलीतील उमेदवार आहेत.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेली पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. गुरुवारी (दि. 12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.  1 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सलग दोनवेळा पुणे पदवीधरचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे यावेळीही मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. तर, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकासआघाडीने मतदारसंघात खेचून आणण्यासाठी जोर लावला आहे.


भाजपने सांगलीतील संग्राम देशमुख यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही सांगलीतील अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्याचा समावेश येत आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे श्री. सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे श्री. अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे.

दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *