Mumbai news : मंत्री धनंजय मुंडे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये केले दाखल

Mumbai news : मंत्री धनंजय मुंडे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये केले दाखल
Pckhabar- राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परत कामाला लागले होते. यानंतर आता पुन्हा एकदा मुंडे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. 

धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच तब्येतीची माहिती दिली आहे. “तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल” असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *