Maharashtra news : रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला २ कोटी ७५ लाख ९२ हजारांची मदत
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला कोरोनाच्या लढाईला २ कोटी ७५ लाख ९२ हजार ८२१ रूपयांचा निधीचा धनादेश रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष पवार म्हणाले, कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply