Maharashtra news : एकच मारला पण सॉलीड मारला!
मंदिर उघडण्यावरून शिवसेनेचा भाजपला टोला
Pckhabar- राज्यात अनलॉकचे विविध टप्प्यात मॉल, चित्रपटगृह आणि दुकानं सुरू कऱण्याची परवानगी दिली. मात्र मंदिर उघडण्यासाठी ठाकरे सरकारनं अद्याप परवानगी न दिल्यानं भाजपने वेगवगळ्या पद्धतीनं आंदोलन करून मंदिर उघडण्याची मागणी केली. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिर उघडण्याबाबत पत्र लिहून हिंदुत्ववादाचा विसर पडला का? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
भाजपची सत्ता गेल्यानं भाजपच्या पोटात दुखत असून आता राज्यपालांनाही या सगळ्या प्रकरणात ओढत असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून राज्यपाल कोश्यारी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
”गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! हे शिवतेज पाहून मंदिरांतील देवांनीही आनंदाने घंटानाद केला असेल. हा घंटानाद पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचलाच असेल, तर ते राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply