पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या तीरावरील नवीन घाटाची भिंत कोसळून चार ठार

पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या तीरावरील नवीन घाटाची भिंत कोसळली 
 चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश
Pckhabar- पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या तीरावरील नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पावसामुळे कोसळली आहे. पावसामुळे आडोशासाठी भिंतीजवळ उभे राहिलेले काही लोक तसेच बाजूच्या झोपडीत राहणारे काहीजण भिंतीच्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आडोशाला थांबलेले लोक हे घाटावर भिख मागणारे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात मदतकार्य करणाऱ्यांना यश आले आहे.
भिंत कोसळल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला . या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर घटनास्थळावर दाखल झाले आहेत. तातडीने जेसीबी आणि रुग्णवाहिका आले असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले होते. पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *