Mumbai news : ‘त्या’ तीन वृत्तवाहिन्या जाहिरातीसाठी ब्लॅकलिस्ट : राजीव बजाज

Mumbai news : ‘त्या’ तीन वृत्तवाहिन्या जाहिरातीसाठी ब्लॅकलिस्ट : राजीव बजाज
Pckhabar- मोठ्या प्रमाणात जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’ (टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, या प्रकरणी आता बजाज ऑटोचे प्रमुख राजीव बजाज यांनी देखील उडी घेतली आहे. जाहीरातींसाठी तीन वाहिन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती बजाज यांनी दिली.

एक सशक्त ब्रँड हा एक पाया आहे, ज्यावर आपण मजबूत व्यवसाय बनवता, असे बजाज म्हणाले. तसंच कंपनी कोणत्याही द्वेषबुद्धीला आणि समाजात विष परसवणाऱ्या मानसिकतेला मान्यता देत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *