देहूगाव येथील हगवणे यांच्या घरी साधेपणाने गणेशोत्सव साजरा
Pckhabar- देहूगाव येथील रहिवासी असलेले बाळकृष्ण हगवणे यांच्या घरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. हगवणे यांच्या घरातील सातव्या दिवशी बाप्पाची विसर्जन करण्यात आले.
हगवणे यांच्या घरी दरवर्षी मोठ्या उत्साहात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हगवणे परिवाराने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी श्री गणेशाची अतिशय साध्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना केली होती.
हगवणे यांच्या घरी गौराईची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गौराई ला पारंपरिक पदार्थांचा नैवैद्य दाखविण्यात आला होता. गौराईला विविध प्रकारचे दागिने घालून नटविण्यात आले होते. गणपती बाप्पा भोवती देखील सजावट करण्यात आली होती.
जगावर आलेल्या कोरोना संकटातून लवकरात लवकर सगळ्यांची सुटका व्हावी यासाठी हगवणे परिवाराने बाप्पाकडे मनोभावे प्रार्थना केली. या गणेशोत्सवासाठी हगवणे परिवारातील बाळकृष्ण हगवणे, आशा हगवणे, मंगेश हगवणे, मानसी हगवणे, अर्णव हगवणे, सई हगवणे हे सर्व सदस्य एकत्र आले होते.
देहूगाव येथील हगवणे यांच्या घरी साधेपणाने गणेशोत्सव साजरा










Leave a Reply