देहूगाव परिसरात आज 27 जणांना डिस्चार्ज, एकाचा मृत्यू, 7 नवे रुग्ण
Pckhabar- देहूगाव परिसरात मंगळवारी 27 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एकाचा मृत्यू झाला असून 7 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 365 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आत्तापर्यंत 264 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
आजपर्यंत 365 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 264 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 94 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजअखेर सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 75 रूग्णांना लक्षणे नसून 19 रुग्णांना लक्षणे आहेत. 27 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे.















Leave a Reply