देहूगाव परिसरात कोरोनाचा धोका वाढतोय, एकाच दिवशी 19 जण बाधित
Pckhabar- देहूगाव परिसरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असून मंगळवारी तब्बल 19 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही आजपर्यंतची एका दिवसात झालेली सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 292 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
मंगळवारी माळवाडीत 9, देहूगावात 6, वडाचा माळ 3, चव्हाणनगर 1 असे 19 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 292 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 202 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 84 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजअखेर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देहू परिसरात कोरोनाची रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, दोन व्यक्तीमध्ये तीन ते चार फुटाचे अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.















Leave a Reply