कोरोना महामारीत अविरत सेवा करणार्‍या डॉ. प्रमोद लोहार यांचा सन्मान

कोरोना महामारीत अविरत सेवा करणार्‍या डॉ. प्रमोद लोहार यांचा सन्मान
Pckhabar- कोरोना विषाणूने देशासह राज्यभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या या महामारीतही अविरत सेवा करणार्‍या देहूगाव येथील डॉ. प्रमोद लोहार यांचा माय मावळ फाऊंडेशन आणि गरूडझेप फाऊंडेशनतर्फे नुकताच सन्मान करण्यात आला आहे.
कोरोनाने जगभरात हाहाकार माजविला आहे. भारतातमध्ये 23 लाखांच्या पुढे रूग्ण संख्या गेली आहे. कोरोनावर अद्याप प्रभावी असे औषध अथवा लस आली नाही. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस सातत्याने मेहनत घेत आहे. कोरोनाच्या या  संकटात एकही दिवस सुट्टी न घेता अविरत वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल डॉ. प्रमोद लोहार यांचा ह. भ. प. अशोक महाराज मोरे यांनी सत्कार केला. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *