Pimpri crime news: जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीचा पाचवा प्रकार उघडकीस

ही बातमी शेअर करा.

Pimpri crime news: जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीचा पाचवा प्रकार उघडकीस
Pckhabar-जम्बो कोविड सेंटरमधून मृत रुग्णांचे मौल्यवान साहित्य चोरीला जात असल्याच्या घटना काही कमी होत नाही. गेल्या काही दिवसात जम्बो कोविड सेंटरमध्ये चोरीचा पाचवा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. रोख रक्कम,  महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र विश्वासराव फणसे (वय 51, रा. टिंगरे नगर, धानोरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सासर्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना 8 एप्रिल रोजी उपचारांसाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दुसर्‍याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जवळील दहा हजारांची रोकड, पॅनकार्ड, आधार कार्ड, पॉलिसी कार्ड, एटीएम कार्ड चोरीला गेले आहे.

दरम्यान, जम्बोतून रूग्णांच्या साहित्याची चोरी होऊ नये म्हणून जम्बो प्रशासनाने नुकतीच एक बैठक घेतली होती. यामध्ये सर्व प्रमुखांना रूग्णांच्या साहित्याची चोरी होऊ नये म्हणून दक्षता घेण्याबाबत सांगितले होते. तर रूग्ण भरती होण्यावेळीच रूग्णांकडे कोणतेही मौल्यवान साहित्य ठेवू नये, असा निर्णय झाला असून त्याप्रमाणे रूग्णांचा अर्ज भरला घेतला जात आहे.


ही बातमी शेअर करा.