Pimpri news: कोरोना संकटात जोखीम पत्करुन वार्तांकन करणारे पत्रकार ‘फ्रंटलाईन हिरो’ : महापौर

ही बातमी शेअर करा.

Pimpri news: कोरोना संकटात जोखीम पत्करुन वार्तांकन करणारे पत्रकार ‘फ्रंटलाईन हिरो’ : महापौर
Pckhabar-पत्रकार समाजाचा प्रतिबिंब असतो. निर्भिड, सडेतोड आणि पारदर्शक पत्रकारीकेच्या माध्यमातून पत्रकारांनी दिलेले योगदान समाजासाठी हितकारक असून अशा पत्रकारांची जपणूक करणे  हे सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. कोरोना संकटकाळात जोखीम पत्करुन वार्तांकन करणारे पत्रकार ख-या अर्थाने फ्रंटलाईन हिरो आहेत असेही त्या म्हणाल्या.

महानगरपालिकेच्या वतीने पत्रकारांसाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जिजामाता रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

कोरोना संकट काळात पत्रकार जीवाची पर्वा न करता वार्तांकन करीत आहेत. लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्यांना धीर देण्याचे काम प्रसारमाध्यमांनी केले. शिवाय गरजू नागरिकांसाठी मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कोरोना काळात सेवा बजावणा-या प्रत्येकाला प्रसारमाध्यमातून लोकांसमोर आणल्याने सेवाव्रती कोरोना सेवकांना सेवा करण्याचे अधिक बळ मिळाले. पत्रकारांनी स्वत:सह कुटूंबाचे आरोग्य जपावे असे अवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.


ही बातमी शेअर करा.