IPL News: 2021 आयपीएल रद्द

ही बातमी शेअर करा.

IPL News: 2021 आयपीएलचा हंगाम रद्द

Pckhabar-बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.

सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पुढे ढलकण्यात आला होता.

त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे काही सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने बुधवारी होणारा. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे. अशात आज सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सटा अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.


ही बातमी शेअर करा.