Pimpri news: YCM साठी एक कार्डीयाक आणि आठ रुग्णवाहिका दाखल

ही बातमी शेअर करा.

Pimpri news: YCM साठी एक कार्डीयाक आणि आठ रुग्णवाहिका दाखल

Pckhabar-कोरोना बाधितांवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी महानगरपालिका सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी कोरोना संबंधित नियमांचे पालन करून शहर निरोगी ठेवण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

वाढती कोरोना रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाण याचा विचार करून नव्याने खरेदी करण्यात आलेल्या एक कार्डीयाक आणि आठ रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली त्याचे लोकार्पण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या.

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या प्रांगणात आज झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत लाठी, डॉ. मारुतराव गायकवाड, डॉ. प्रविण सोनी, डॉ. विनायक पाटील, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी महापौर निधीतून दोन कार्डीयाक रुग्णवाहिका आणि रक्तपेढीसाठी सुसज्ज मिनी बस लोकार्पण करण्यात आली होती.

आज लोकार्पण केलेल्या वातानुकूलित कार्डीयाक रुग्णवाहिका ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, स्ट्रेचर आदी सुविधांसह सुसज्ज आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉय यांना बसण्यासाठी देखील व्यवस्था आहे. शिवाय ऑक्सिजन सिलेंडरकरिता बाहेरील बाजूस सिलेंडर रिफिलिंगची सोय आहे.


ही बातमी शेअर करा.